Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

डुप्लिकेट चावीने लॉक उघडले आणि रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा वाढू लागला आहे. तसतसं जिल्ह्यात चोरीच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत.

नुकतेच शहरातील गाझीनगरमध्ये चोरटयांनी डुप्लिकेट चावीने लॉक उघडून घरातील 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

Advertisement

याबाबत मुजाहिद जावेद बागवान यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

गाझीनगरमधील सॉ मिल समोर बागवान यांचे घर आहे.चोरट्यांनी घराचे कुलूप डुप्लिकेट चावीचा वापर करून उघडले.

Advertisement

घरातील सामनाची उचकापाचक करत लॉकरमध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा 66 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li