आलिया भट्टला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मला कोरोनाची लागण झाली आहे. हॅलो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यानंतर मी स्वत:ला विलग करुन घेतलं असून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स आणि डॉक्टरांच्या सूचनेचे मी पालन करत आहे.

तुमच्या प्रेम आणि आधाराबद्दल धन्यवाद, सर्वांनी काळजी घ्या, असे आलिया भट्टने यात म्हटलं आहे.आलिया आणि रणबीर लवकरच लग्न करणार आहे.

आता ते अनेकदा एकत्र दिसतात. आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी देखील असतात. चाहत्यांची बॉलिवूडमधील ही आवडती जोडी आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|