Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे म्हणाले माझ्या पोलिस संरक्षणात वाढ करा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरण बहुचर्चित झाले आहे. स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी आता पोलिस संरक्षणात वाढ करण्याची मागणी केली आहे. तशा प्रकारचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांच्याकडे दिले आहे.

स्वत:ला दिलेले पोलिस संरक्षण वाढवून मिळावे, तसेच आणखी एक पोलिस कुटूंबियांकरिता नियुक्त करावा, असे त्यांनी नमूद केले आहे. श्री. रुणाल जरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

जरे हत्याकांड प्रकरणी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणे बाकी आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षकांनी स्वत:ला पोलिस संरक्षण दिले होते.

परंतु बोठे यास अटक झाल्यानंतर माझे पोलिस संरक्षण कमी करण्यात आले. आता एकच पोलिस संरक्षणासाठी देण्यात आलेला आहे. माझ्या कुटूंबियावर सध्या भितीचे सावट आहे.

Advertisement

मला केससंदर्भात बाहेर पडावे लागत आहे. आरोपी मला व माझ्या कुटूंबियांना संपवून टाकू शकतो, म्हणूनच पोलिस संरक्षणात वाढ करावी, असे जरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

Advertisement
li