Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

बिबट्याची बछडे आढळल्याने शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-रब्बी हंगामातील पिके शेवटच्या पाण्यावर असताना श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे एक मोठे संकट येऊन ठेपले आहे.

तालुक्यातील उक्कलगाव शिवारात उसाच्या शेतात बिबट्याची दोन बछडी आढळल्याने शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी कि, उक्कलगाव येथील शिवाजी गंगाधर थोरात यांच्या उसाची तोड चालू असताना बिबट्याची दोन नवजात बछडी ऊसतोडणी कामगारांच्या निदर्शनास पडली. त्यानंतर याबाबत वनविभागाला कळविण्यात आले.

वनखात्याचे सुरासे हे घटनास्थळी आले ते म्हणाले कि, बिबट्याची बछडे इतरत्र हलवली तर मादी धुडगूस घालेल. उसाचे क्षेत्र उघडे झाल्याने ती पिल्ले घेऊन रात्रीतून निघून जाईल अशी शेतकर्‍यांची बोळवण करून ते निघून गेले.

Advertisement

मात्र गतवर्षी बिबट्याने गळनिंब शिवारात लहान बालकावर हल्ला करून ठार केलेल्या ठिकाणापासून हे क्षेत्र हाकेच्या अंतरावर असून येथील वस्तीवरील लहान मुले , वृध्द व रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांच्या जिवितास धोका आहे.

मात्र वनखाते याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही. घटना घडून दोन दिवस उलटले तरी बिबट्याची बछडे आहे त्याच जागेवर असून मादी रात्री येऊन त्यांना दूध पाजून निघून जाते असे प्रत्यक्षदर्शी शेतकरी उत्तम थोरात व प्रकाश थोरात यांनी सांगितले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li