Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नगरकरांनो लक्ष द्या; शहराचा पाणी पुरवठा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेतील मुख्य व जुनी जलवाहिनीला गळती सुरू झाली आहे.

तसेच मुळानगर पाणीपुरवठा याेजनेला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी शटडाऊन घेतले जाणार आहे.

Advertisement

त्यामुळे शनिवार, रविवार व साेमवार या तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

नगर शहराचा तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत हाेणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Advertisement

जाणून घ्या कसे असणार आहे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन रविवार (दि.4 एप्रिल) : बाेल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर, पाईपलाईन राेड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर,

मुकुंदनगर, स्टेशन राेड, विनायकनगर, केडगाव, नगर-कल्याण राेडवरील शिवाजीनगर परिसरात उद्या शनिवार ऐवजी रविवारी (ता.4) पाणीपुरवठा हाेईल.

Advertisement

सोमवार (दि.5 एप्रिल) : शहराचा मध्यवर्ती भाग, मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली,

धरती चाैक, माळीवाडा, काेठी, गुलमाेहाेर राेड, प्राेफेसर काॅलनी, सिव्हिल हडकाे, प्रेमदान हडकाे, म्युनिसीपल हडकाे, सावेडी, सारसनगर,

Advertisement

बुरुडगांवराेड भागात रविवार ऐवजी साेमवारी (ता. 5) पाणीपुरवठा हाेईल. मंगळवार (दि.6 एप्रिल) : सर्जेपुरा, ताेफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्ली दरवाजा,

नालेगाव, चितळे राेड, ख्रिस्तगल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम राेड, सारसनगर, बुरूडगाव राेड, सावेडी या भागात साेमवार ऐवजी मंगळवारी (ता. 6) पाणीपुरवठा हाेईल.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li