Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

धक्कादायक ! 24 तासात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आता वेगाने होऊ लागला आहे.दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहेच मात्र आता यामध्ये मृत्यूचा आकडा देखील वाढू लागला आहे.

नुकतेच कोपरगाव मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात 31 मार्च रोजी सापडलेल्या 65 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली,

Advertisement

त्यात 83 तर खासगी लॅब मधील ४९ व अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 14 असे 146 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

शहरातील 58 व 20 वर्षीय महिला, गांधीनगर येथील 65 वर्षीय पुरुष, टाकळी येथील 58 वर्षीय पुरुष, धारणगाव रोड येथील 65 वर्षीय पुरुष, सोनेवाडी येथील 75 वर्षीय महिला या 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची

Advertisement

माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यात 1 एप्रिलपर्यंत 4 हजार 707 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून चार हजार 160 रुग्ण बरे झाले आहे.

तसेच 551 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 24 हजार 692 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 19.6 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.23 टक्के असे आहे. तर 58 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li