Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

बनावट रेशन कार्डचा अहवाल दिल्याने महिला तलाठ्यास मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- रेशनकार्डाचा अहवाल तहसील कार्यालयास दिल्याच्या कारणामुळे महिला तलाठ्यास तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करुन विटाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी शेवगाव येथे तहसील कार्यालयासमोर घडली.

याप्रकरणी आंतरवाली खुर्दच्या तलाठी शुभांगी प्रल्हाद ससाणे (३७) यांच्या फिर्यादीवरुन छाया अविनाश सपकाळ, सोमनाथ अविनाश सपकाळ व सोन्याबापू सुभाष कासुळे (सर्व रा.आंतरवाली खुर्द ता. शेवगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

फिर्यादीत ससाणे यांनी म्हटले आहे की, आंतरवाली बुद्रुक व खुर्द, चेडे चांदगाव व बेलगाव अशा चार गावांचा दीड वर्षापासून पदभार माझ्याकडे आहे.

१० आॅक्टोबर २०२० रोजी कार्यालयात काम करत असतांना सोन्याबापू कासुळे हे छाया सपकाळे यांच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आले होते. त्यांना मी रेशनकार्डची मागणी केली.

Advertisement

त्यांनी मला रेशनकार्डची झेराॅक्स दाखवल्याने त्यावरुन मी त्यांना उत्पन्नाचा दाखला दिला. त्यानंतर आंतरवाली खुर्द येथे बोगस शिधापत्रिका शोध मोहीम सुरु असताना स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे छाया सपकाळ यांचे जमा असलेल्या रेशनकार्डच्या झेराॅक्सची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे मी तहसील कार्यालयास तसा अहवाल दिला. त्याची चौकशी सुरु असल्याचे छाया, सोमनाथ, व सोन्याबापू या तिघांना समजल्याने १९ फेब्रुवारी २०२१ रोजी बोधेगाव येथील आंतरवाली खुर्द तलाठी कार्यालयासमोर त्यांनी मला तेथे शिवीगाळ करुन दमदाटी केली होती.

Advertisement

मंगळवारी (३० मार्च) छाया, सोमनाथ व सोन्याबापू यांनी शिवीगाळ केली. व छाया हिने विटाच्या सहाय्याने मारहाण केली. पोलिसांनी छाया सपकाळे, सोमनाथ सपकाळे व सोन्याबापू कासुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li