This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-राहूरी येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या चालकाचा स्टेरिंगवरिल ताबा सुटून बाजुला असलेल्या खड्ड्यात एस टि बस गेल्याने बसमधील १२ प्रवासी सुखरुप तर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आहे.
श्रीरामपूर -अहमदनगर एस टी बसचा राहुरीतील नगर मनमाड रोड लगत सूर्या पेट्रोल पंप महामार्गावर अपघात झाला आहे.
Advertisement
बस मध्ये असलेले १२प्रवासी सुखरूप असून वाहकास किरकोळ जखम झाली आहे. घटनेची माहिती कळताच अपघाताच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके ,पो ना.शिवाजी खरात,पाखरे यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.
राहुरी नगरपरिषेचे अग्निशामन दलाचे जवान नंदू मोरेसह स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. अपघात झाल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.
Advertisement
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|