Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात उद्या जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-सध्या दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य रोग वाढतच असल्याने या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून उद्या ( दि.४ रोजी,) सोनई मध्ये जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या महाभयंकर रोगाची साखळी तोडणे गरजेचे असून प्रशासन सह प्रत्यक्ष लोकसहभाग महत्वाचा आहे.

Advertisement

त्यासाठी येथे भरणारा आठवडे बाजार भरणार नाही, अशी माहिती ग्रामपंचायतचे सरपंच धनंजय वाघ यांनी दिली आहे.

नुकतीच ग्रामपंचायतमध्ये सोशल डिस्टन्स द्वारे चर्चा विनिमय करून सर्वांचे मत विचारात घेऊन ४ रोजी भरण्यात येणारा भाजीपाला, रविवार आठवडे बाजार बंद ठेऊन गावातील सर्व नागरिक जनता कर्फ्यू पाळणार आहे.

Advertisement

त्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन व नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे ग्रामपंचायत प्रशासन द्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान तालुक्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. जनता कर्फ्फुसह प्रशासनाने लावलेले निर्बंध नागरिकांकडून धाब्यावर बसवले जात असल्याने जिल्ह्यात, तालुक्यातील कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li