Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

महिलेवर सामुहिक बलात्कार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement

इतर दोघे पसार झाले आहे. त्या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाले आहेत. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,

एक ३० वर्षी महिला कामानिमित्ताने आष्टी येथून नगरला आली होती. काम अटोपल्यानंतर ती रस्त्याने निंबोडी शिवारातून जात होती.

Advertisement

तेथे तिन्ही नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तसेच त्या महिलेकडील ९ हजार रुपये काढून घेतले.

हा प्रकार पिडीत महिलेने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पोलिसांना सांगितला. तद्नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li