Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करू : ना. तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांनीच स्वत:सह आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज असून, तिसगाव येथे सुरू करण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पीपीईकीटसह कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही प्राजक्त मंत्री तनपुरे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने राहुरी- नगर- पाथर्डी -मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोल्हार, करंजी, तिसगाव, या गावांना धावती भेट देत येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

Advertisement

या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत तिसगावमध्ये ॲक्टिव रुग्ण वीस असल्याचे सांगत पीपीईिकट कमी प्रमाणात मिळत असल्याचे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यावर मंत्री तनपुरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कुठल्याही प्रकारे तिसगाव आरोग्य केंद्राला पीपीईिकटसह लसीची कमर्तता भासू देऊ नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

Advertisement

त्याचबरोबर तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सुरू करण्यात येणाऱ्या कोविड सेंटरला तत्काळ बेड उपलब्ध करून देणार असून या कोवीड सेंटरला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मंत्री तनपुरे यांनी या वेळी दिली.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी ५० खाटांचे कोवीड सेंटर उभारले जाणार असून, या उपक्रमाचे मंत्री तनपुरे यांनी कौतुक करत या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना जेवण,औषधे व बेडची अवस्था केली जाणार आहे.

Advertisement

यासाठी तिसगाव ग्रामपंचायतचे मोठे सहकार्य राहणार असल्याचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर, आरोग्यसेविका यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे.

सरपंच लवांडे पाटील यांना उपोषणाला बसण्याचा इशारा देण्याची वेळ येते याचा अर्थ या आरोग्य केंद्रात सर्व काही ठिक चाललंय, असे म्हणता येणार नाही, यापुढे हलगर्जीपणा झाल्यास कारवाई केली ज़ाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement

बैठकीस प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, माजी सरपंच इलियास शेख सर, सुनील पुंड, सरपंच अमोल वाघ,

रवींद्र मुळे, युवानेते बाबासाहेब बुधवंत, ग्रामपंचायत सदस्य पापाभाई तांबोळी, नाथा वाबळे, भाऊसाहेब लवांडे, सुनील लवांडे, डॉ. अर्चना लांडे, डॉ. होडशिळ यांच्यासह आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविक, मदतनीस व आशा सेविका उपस्थित होत्या.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li