Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नगर तालुका दूध संघात कोट्यवधींचा गैरव्यवहार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुका दुध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने 8 कोटी 52 लाख 68 हजार 28 रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर (वय 54 रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी कि, मार्च 2019 ते मार्च 2020 या काळात नगर तालुका दूध संघात आरोपींनी खोटे लेखे तयार केले, दस्तऐवजात खोट्या नोंदी केल्या,

कर चुकविण्याच्या गैरहेतुने नियोजन करुन शासनाची फसवणुक होण्याच्या उद्देशाने संगणमताने कट करून खोटे व चुकीचे लेखे तयार केले.

Advertisement

फसवणुकीच्या उद्देशाने कर्मचार्‍यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातुन काढुन निरंक (अद्रुष्य) करुन गैरव्यवहार केला.

या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये गोरख पाराजी पालवे, उद्धव रावसाहेब अमृते, किसन बाबुराव बेरड, मोहन संतुजी तवले,

कैलास अंजाबापु मते, सागर शेषराव साबळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, रामदास शंकर शेळके, बजरंग किसन पाडळकर,

Advertisement

सुभाष गंगाधर लांडगे, अर्जुन सर्जराव गुंड, राजाराम चंद्रभान धामने, मधुकर किसन मगर, भिमराज रामभाऊ लांडगे, गोरख रामभाऊ काळे,

स्वप्निल बाबासाहेब बुलाखे, वैशाली आदिनाथ मते, पुष्पा शरद कोठुळे, गुलाब केरुजी कार्ले, गुलाब मारुती काळे यांचा समावेश आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li