Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे . शंकरराव गडाख यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

त्यांनी याबाबत माहिती देताना आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे कि माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगिकरणांत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

सर्वाना विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे,आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्यावी, मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असेही त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कठोर निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आलीय. अशास्थितीत राज्याची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आहे.

Advertisement

राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजार 508 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर राज्यात काल तब्बल 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 30 लाख 10 हजार 597 झाली आहे. त्यातील 25 लाख 22 हजार 823 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

Advertisement

तर 55 हजार 878 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 30 हजार 503 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li