This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला आहे.
गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 1842 रुग्ण आढळले आहेत.तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढील प्रमाणे –
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अहमदनगर शहर 666, राहाता 141, संगमनेर 113, श्रीरामपूर 150, नेवासे 54, नगर तालुका 129, पाथर्डी 59, अकोले 69, कोपरगाव 109, कर्जत 33, पारनेर 61, राहुरी 64, भिंगार 25, शेवगाव 94, जामखेड 23,
श्रीगोंदे 25, मिलीटरी हॉस्पिटल 4, आणि इतर जिल्ह्यातील 23 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 672, खाजगी प्रयोगशाळेनुसार 580 आणि रॅपिड चाचणीमध्ये 590 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
काेराेनापासून दूर राहण्यासाठी हे करा
- रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावी.
- मास्क कटाक्षाने नियमितपणे लावा.
- चेहऱ्याला, तसेच मास्कला वारंवार हात लावू नये.
- सर्दी, खोकला असल्यास मास्क,
- रुमाल यांचा उपयोग करा.
- मास्क टाकून देण्यापूर्वी त्यावर सॅनिटायझर शिंपडून त्यांचे तुकडे करून नंतर कचऱ्यात टाका.
- साबणाने हात धुवा.
- सॅनिटायझरची लहान बाटली सोबत बाळगा
- कोणाशीही बोलताना एकमेकांच्या चेहऱ्याकडे थेटपणे बघू नका,
- शक्य असल्यास जेवण करताना समोरासमोर बसू नका,
- जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करा,
- झोप, व्यायाम, योग आदींद्वारे प्रतिकारशक्ती वाढवा, बंदिस्त वातावरण टाळावे.
- गर्दीत जाणे टाळा,वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळा,
- अरुंद ठिकाणी जास्त वेळ थांबू नका,
- सार्वजनिक ठिकाणी वावरताना थुंकू नका.
- घरी परतल्यावर आंघोळ करा.
- कोमट पाणी प्या, घरचे खाणे व घरचे पाणी यास प्राधान्य द्या.
- प्राणवायू पातळी मोजत राहा. थर्मामीटर, थर्मल स्क्रीनिंग गन घरात ठेवा.
- न धुता कपड्यांचा पुन्हा वापर करू नका.
- भ्रमणध्वनीवर प्लास्टिकचे पारदर्शक आच्छादन वापरा.
- कौटुंबिक समारंभ, पार्टी यांचे आयोजन करू नका.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|