This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कंटेनर व दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.
ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी (ता. नगर) शिवारात रविवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास घडली.
औरंगाबादकडून नगरकडे लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला (एमएच ४० बीएल ७५) ओव्हरटेक करताना दुचाकी स्प्लेंडर (एमएच १६ सीआर २७८२) चा अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वार विजय शामराव साबळे (रा. ढोरजळगाव ता. शेवगाव) हा जागेवर मयत झाला. तर दादासाहेब रामभाऊ लोंढे हे गंभीर जखमी झाले.
अपघातग्रस्तांना माजी सैनिक गिरीश मगर, दत्तात्रय शिकारे, बालू म्हस्के, सुभाष शिकारे यांनी मदत केली.
एमआयडीसीचे पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॉन्स्टेबल महंमद शेख, पोलीस नाईक दिपक गांगर्डे, कॉन्स्टेबल संदीप आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|