Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या त्या व्यापाऱ्यास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या व्यापारी मुथा प्रकारणातील दोघांना जेरबंद केले.

मुख्य आरोपीचा भाऊ गणेश रामलाल मुथा व त्याची पत्नी आशा गणेश मुथा यांना पोलिसांनी जळगाव येथून अटक केली.

Advertisement

त्यांच्याकडून एक चारचाकी, एक दुचाकी व ५० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, भामाठाण यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांना भुसार माल खरेदी करून

Advertisement

कोट्यवधी रुपयांना गंडा घालून, माळवाडगांव येथील व्यापारी रमेश मूथ्था हा आपल्या कुटुंबीयांसह ६ फेब्रुवारी रोजी पसार झाल्याची घटना घडली होती,

यासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र यासंदर्भात पोलीस तपास संथ गतीने चालू असल्याने, पीडित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली असताना,

Advertisement

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे व डीवायएसपी संदीप मिटके यांना, मुथ्था प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आदेश दिले,

त्यानंतर १९ दिवसानंतर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने, जळगाव येथून मुथा प्रकरणातील दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li