Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

लॉकडाऊनचा आदेश आणि विरोध सुरु… व्यापाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊनची घोषणा करत कठोर निर्बंध लावण्यात आले.

यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शविला आहे. याबाबत पाथर्डी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना निवदेन दिले आहे. मिनी लॉकडाऊनची घोषणा होताच पाथर्डी शहरात सर्वत्र शुकशुकाट झाला होता.

Advertisement

यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असून अशा लॉकडाऊनला विरोध दर्शवत, व्यावसायिकांना पूर्ण बंदचे आदेशाऐवजी काही तास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे पाथर्डीतील व्यावसायिकांनी केली आहे.

आजपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे याचे निर्बंध नसून तो एकप्रकारचा लॉकडाऊनच आहे.

Advertisement

आज पाथर्डी शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत आपले व्यवसाय बंद ठेवले. मात्र जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेले निर्बंध हे एकप्रकारचे लॉकडाऊन आहे.

यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून जाणार आहे. हातावरचे पोट असलेल्या दुकान कामगारांचा रोजगार बुडणार आहे. छोटे-मोठे व्यावसायिक यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार असून याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li