Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

मंत्री बच्चू कडूंनी स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावली

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू सर्वसामान्यांना होणाऱ्या अन्यायावर नेहमीच कणखर भूमिका घेताना दिसतात.

नुकतीच अशीच काहीशी घटना आता घडली असून त्यांनी अकोल्यात खानसामा अर्थात स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे.

Advertisement

अकोला जिल्हा रुग्णालयातील स्वंयपाक घराला (मेस) बच्चू कडू यांनी भेट दिली. कडू यांना यावेळी मेसमधील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचे लक्षात आले.

त्यातूनच त्या स्वयंपाक्याच्या कानशिलात बच्चू कडू यांनी लगावली. मेससंदर्भात एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची पाहणी केली.

Advertisement

यावेळी धान्यसाठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li