Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

शहरातील विकासकामे ठरतायत अडथळ्याची कारणे; नगरसेविकेने दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-शहरात अनेक विकासकामांच्या नावाखाली ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. ज्याठिकाणी रस्ते चांगली आहेत त्या ठिकाणी जेसीबीने खड्डे खोदून त्या रस्त्यांची दुर्दशा करण्यात आली आहे.

शहरातील विकासकामेच आता नागरिकांसाठी अडचणीचे करणे ठरू लागले आहे. यामुळे नगरकर वैतागले आहे.

Advertisement

संशयाग्रस्त नागरिकांकडून तक्रारीचा पाढा आपल्या प्रभागातील नगरसेवकांपुढे वाढला जातो आहे.

यातूनच शहरातील नगरसेविका परवीन कुरेशी यांनी आक्रमक होऊन मनपाला इशारा दिला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये भुयारी गटारीचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्ते खोदण्यात आले असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

Advertisement

पिण्याच्या पाण्याचे नळही ठेकेदाराने तोडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाणी मिळत नाही.

महापालिकेने तातडीने दुुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका परवीन कुरेशी यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li