Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ; मात्र व्यापारी सापडले संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने कालपासून रात्री उशिरा लॉकडाऊन जाहीर केले आहे.

25 दिवस लॉकडाऊन म्हणजे छोटे मोठे लहान व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले असल्याने सर्व व्यापार्‍यांनी या लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उगाचच कारवाई नको म्हणून अनेकांनी आपली दुकान स्वतः बंद ठेवली होती.

Advertisement

परंतु काय सुरु आणि काय बंद याबाबत संभ्रमात असणार्‍या व्यापार्‍यांनी पोलीस स्टेशन गाठत तेथे असलेल्या प्रांताधिकार्‍यांची भेट घेतली. व्यापार्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

त्यावेळी प्रांताधिकार्‍यांनी आजपासून शहरात कडक अंमलबजावणी करणार असल्याचे व्यापार्‍यांना सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली.

Advertisement

मात्र बेलापूर रोड पुलावर तसेच चौका चौकात गर्दीच दिसून येत होती. भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी होती. प्रशासनाने काही ठिकाणी दुकाने सील करण्याची कारवाई सुरु केल्याने व्यापारी संतप्त झाले होते.

यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, आजपासून शहरातील सर्वच भागात कडक निर्बंध लावले जाणार असून हे नियमांची अंमलबजावणी करण्यात येवून कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li