Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर मधील बाजारपेठ बंद, कापडबाजारात अशी आहे आजची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील विविध ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement

याच पार्श्वभुमीवर अहमदनगर मध्ये देखील येत्या 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. याच अनुषंगाने शहरात देखील कडकडीत नियम पाळण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आल्याने नगरमध्ये आज मोठा परिणाम पहायला मिळाला.

Advertisement

‌कापडबाजारातील दुकाने बंद असल्याने मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या झाल्या. बाजार पेठा बंद असल्याने अर्थकारणावर मोठा परिणाम जाणवणार आहे.

आज बहुतांश ठिकाणी बंद असताना रस्त्यावर लोकांची गर्दी मात्र कायम होती. लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी पहायला मिळाली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li