Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ प्रसिद्ध चाचाचे वडापाव सेंटर सील !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-खाता का नेता, अक्का आठ नेता का?, पैसे की फिक्र नको खाते में लिख देता, असे म्हणणारे एक वडापाववाले चाचा अहमदनगर मधील संगमनेर तालुक्यात आपले लोकप्रिय वडापाव सेंटर चालवतात.

आपल्या हटके बोलण्याच्या शैलीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या चाचांचे नाव मोहम्मद अन्सार आहे. ते आता सगळीकडेच वडापाव चाचा नावाने प्रसिद्ध झाले आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये राहणाऱ्या या चाचांनी नसीब वडापाव सेंटरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. चाचांच्या या दुकानावर वडापावचे शौकीन नेहमीच गर्दी करुन असतात.

हे चाचा त्यांच्या सेल्समनशिप करताना त्यांच्या हटके बोलण्यावरुन ओळखले जातात. ते ग्राहकांना इतके आकर्षित करतात कि एकदा त्यांच्याकडे आलेला ग्राहक पुन्हा त्यांच्याकडे वळून त्यांच्याकडेच येतात.

Advertisement

मात्र त्यांच्या चहात्यांसाठी एक वाईट बातमी आहे कारण आज संगमनेरजवळील समनापूर येथे सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध नशिब वडापाव सेंटर येथे वडापाव खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे आढळून आले.

संबंधीत वडापाव सेंटर चालकाने करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे नियम न पाळल्याने सदर वडापाव सेंटर सात दिवसांसाठी प्रशासनाने सील केले आहे. सदर वडापाव सेंटरवर वडापाव खरेदी करणार्‍यांनी सामाजिक अंतर न ठेवता,

Advertisement

मास्क व सॅनिटायझरचा वापर न केला नसल्याचे आढळले. अंदाजे 50 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा करुन घोळक्याने वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या पथकाने जावून सदर वडापाव सेंटरचा पंचनामा केला. सदर अस्थापनेने करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने नशिब वडापाव सेंटर मौजे समनापूर हे दुकान 5 मार्चपासून पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li