Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

देशमुखांनी २ कोटी, तर परब यांनी मागितले होते ५० कोटी !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-पवार मला नोकरीवर ठेवू इच्छित नव्हते, मात्र मी पवार साहेबांची मी समजूत काढेन.

नोकरी टिकवून ठेवण्यासाठी २ कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितले होते, असा आरोप निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी प्रसारमाध्यमांना शेअर केलेल्या तीन पानी पत्रात केला अाहे.

Advertisement

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही कायदा भंग करणाऱ्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगितलं होतं, असा आरोपही वाझे यांनी केला आहे.

तसेच मुख्य म्हणजे परब यांनी SBUT या ट्रस्टकडून चौकशी बंद करण्यासाठी ५० कोटी घे, असे देखील सांगितले असल्याची माहिती पत्रात नमूद आहे. आता पुन्हा वाझेंच्या या नव्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडीला नव्या अडचणीला तोंड द्यावं लागणार आहे.

Advertisement

वाझे यांना पुन्हा कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते, या प्रकरणात अनिल देशमुखांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं आहे.

हायकोर्टाने या प्रकरणाची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआय दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपा नेत्यांना ठाकरे सरकारवर टीका करण्याची संधी सापडली होती. वाझेंना जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं.

दरम्यान डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUT या ट्रस्टबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं.

Advertisement

त्यानंतर ट्रस्टींना विश्वासात घेऊन चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT कडून ५० कोटी रुपये मागण्यास सांगितले होते.

मात्र तेव्हा देखील वाझेंनी हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUT बद्दल माहिती नाही. त्याचबरोबर त्या चौकशीवरही आपले नियंत्रण नाही, असे वाझे यांनी पत्रात म्हटलं आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li