Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

खा. उदयनराजे म्हणतात,राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

मनसुख हिरेन, अँटिलिया बॉम्ब प्रकरण, परमबीर सिंह यांचं पत्र त्यापाठोपाठ आता सचिन वाझे यांचं पत्र यावरून राज्याच्या राजकारणात दररोज नवा ट्विस्ट येत आहे. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

सातारा येथे पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, गो करोना गो करोना असे म्हणून करोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी.

राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत.

Advertisement

मात्र, आरोग्य महत्त्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत. जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भितीने लाखो लोक हृदयविकाराने गेले.

त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा”, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले होते.

Advertisement

त्यावरही उदयनराजे यांनी स्पष्टीकरण दिलं. शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी भेटलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र सध्या राज्याचं राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय.

राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे. ही तर सुरुवात आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तेव्हा कळेल राजकारण कुठं चाललंय, असेही उदयनराजे म्हणाले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li