Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

मंत्री महोदय म्हणाले…मागेल त्याला कोरोनाची लस द्या

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे, यातच कोरोनाचा सर्वाधिक फैलाव हा महाराष्ट्र राज्यात झाला आहे.

यामुळे राज्यात लसीकरणावर अधिक भर देण्यात येत आहे. 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तिने लस मागितली तर त्याला लस देण्यात यावी, त्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

त्याची ही मागणी योग्य असून केंद्राने प्रारंभी किमान महाराष्ट्रासारख्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या काही राज्यांमध्ये तरी नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Advertisement

कोरोनाच्या नव्या लाटेत तरुणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा 45 वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता 18 वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याची परवानगी असावी, अशी मागणी केली आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लस उत्पादकांशी चर्चा करून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी आणि सुरूवातीला महाराष्ट्रासारख्या अतिबाधीत राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी अधिकाधिक लसींची उपलब्धता करून द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li