This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. पुण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे.
त्यामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयाने बेडची कमतरता भासत असल्याने ३ खासगी हॉटेल्स भाड्याने घेऊन त्याठिकाणी १८० रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
यावरून पुण्यातील कोरोनाची भीषणता किती आहे याचा अंदाज लावता येईल. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच राज्य सरकारतर्फे लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
नागरिकांना वारंवार नियमांचं पालन करण्यास सांगूनही नियमांचं काटेकोर पालन होत नसल्याने सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे.
त्यामुळे ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. गेल्या १५ दिवसांपासून पुणे शहरात दररोज जवळपास 4 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे कोरोना रोखण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु, नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश येत नाही.
त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सध्या पुण्यामध्ये ३९ हजार ५१८ सक्रिय रुग्णसंख्या असून आतापर्यंत ५ हजार ४११ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|