Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात संचारबंदी , जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वेगळात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यातच चोरी छुप्या पद्धतीने दारूची विक्री सुरु आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी कि, पहिल्या कारवाईमध्ये कोपरगावचे पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे यांनी शहरातील खंदकनाला परिसरात विनानंबरच्या दुचाकीवरून दारूचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या सागर शंकर गिरमे व रवींद्र निंबा साळुंके

(दोघे रा. येसगाव ता. कोपरगाव) यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील दारूच्या बॉक्स व दुचाकी असा १८ हजार २८० रुपयांचा मुदेमाल हस्तगत केला आहे.

Advertisement

तर दुसऱ्या कारवाईमध्ये मंगळवारी पोलीस हवालदार संभाजी शिंदे यांनी शहरातील हनुमानगर येथे विक्रम सुदाम चंदनशिव

(वय ३७, रा. १०५ हनुमाननगर, कोपरगाव) हा त्याच्या घरात दारूची विक्री करीत असताना त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्याकडून १,३०० रुपये किमतीच्या २५ दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

Advertisement
li