Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच महाविकास आघाडीचा कार्यक्रम

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे.

एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Advertisement

महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत, असेही ते म्हणाले. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जावडेकर म्हणााले, राज्याचे मुख्यमंत्री ११ मार्चला सांगतात की सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाही. त्याला प्रमाणपत्र देतात. वाझेला अटक झाल्यानंतर १४ मार्चला संजय राऊत म्हणतात एका सक्षम तपास अधिकाऱ्याला त्रास दिला जातोय.

Advertisement

शेवटपर्यंत सचिन वाझेचं समर्थन करत होते. सचिन वाझे सत्य बोलेल की काय, यासाठी त्याचं समर्थन सुरू होतं. आता सचिन वाझेचं पत्र आलंय. पत्रात तर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे वसूल करायला सांगितलं,

पुन्हा सेवेत आल्यानंतर वाझेंना काढलं जाऊ नये यासाठी २ कोटी मागितले. अनिल परब यांनी देखील भेडी बाजार पुनर्वसन योजनेतून ५० कोटींच्या वसुली करण्याची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडून देखील २ कोटींच मागणी केली.

Advertisement

ही संपूर्ण लूट सुरू होती. पण जसे अनिल परब यांच्यावर आरोप झाले, तशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे शांत झाले. आता वाझे सत्य बोलू लागल्यानंतर त्याच्याविरोधात बोललं जात आहे”, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतलं. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतलं. जगात सगळं पाहिलं असेल, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिलं नसेल.

Advertisement

हेही मुंबईने पाहिलं. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात.

त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते. हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर आता समोर येईलच. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचं पत्र आलंय”, असं जावडेकर यावेळी म्हणाले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li