कारागृहातील कैदी येऊ लागलेत कोरोनाच्या विळख्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजेच राहता, राहुरी, संगमनेर, कोपरगाव आयडी तालुक्यांमध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

यामुळे दरदिवशी या ठिकाणची आकडेवारी वाढतच दिसून येत आहे. नुकतेच कोरोनाचा शिरकाव कारागृहात देखील झालेला आहे. यामुळे अनेक कैदी हे कोरोनाबाधित झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोरोनाने कोपरगावच्या दुय्यम कारागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.

बुधवारी तपासणी केल्यानंतर ३४ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर मंगळवारी ८ कैदी बाधित आढळले होते. त्यामुळे ४२ बाधित कैद्यांची संख्या ४२ इतकी झाली आहे. तसेच कारागृहात कर्तव्यावर असलेल्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची बाधा झाली असल्याची

माहिती दुय्यम कारागृहाचे प्रभारी तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी एका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा कोरोना अहवाल बाधित आला होता. त्यानंतर संपूर्ण कारागृहामधील ७९ कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४२ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

या कारागृहामध्ये ८० कैदी होते. या कारागृहाची क्षमता २१ कैद्यांची असताना ४ पटीने जास्त कैदी कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले होते. दरम्यान, मंगळवारी ८ कैदी बाधित आल्यानंतर प्रशासनाने १९ कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली असून सध्या न्यायालयीन कोठडीतील ५० ते पोलीस कोठडीतील १ असे एकूण ५१ कैदी कारागृहात बंद आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|