This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाची पुन्हा लाट उसळली आहे. याचाच प्रवाह जिल्ह्यात देखील वाहू लागला आहे.
यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. यातच पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांचे दुकाने जोरात सुरु झाली आहे.
मागील कोरोनाच्या लाटेत रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले वसूल केली. त्याच गोष्टींची पुनरावृत्ती यंदाच्या कोरोना लाटेत देखील होताना दिसत आहे.
दरम्यान रुग्णालयांनी शासकीय दरानेच बिल आकारली जावी यासंबंधी आदेश दिले आहे. असे असतानाही रुग्णालयांनी जिल्हाधिकऱ्यांच्या आदेशाला ठेंगा दाखविला आहे.
व आपल्या मनमानी प्रमाणेच रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत आहे. मागील वर्षाच्या करोना लाटेत शहरातील 15 हॉस्पिटलने रुग्णांकडून सव्वा कोटी रूपये अतिरिक्त आकारणी करत उकळले.
जिल्हा प्रशासनाने हे पैसे रुग्णांना परत करण्याचे आदेश देऊनही त्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
करोनाग्रस्तांकडून जास्तीचे बिले उकळणार्या हॉस्पिटल प्रशासनाने दुसर्या लाटेत पुन्हा एकदा कोबीड सेंटर कार्यान्वीत केले आहे. पूर्वीसारखेच ते पुन्हा अतिरिक्त बिल आकारणी करून गरीबांना लुटतील.
त्यामुळे अशा हॉस्पिटलमधील कोवीड सेंटर महापालिकेत चालवावीत अशी मागणी राष्ट्रवादीचे भिंगार येथील पदाधिकारी मतीन सय्यद यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|