Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

दुर्दैवी : रोड रोलरखाली दबून एकाचा मृत्यू  

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- रस्त्याचे काम सुरु असल्याने त्या रस्त्यावरून रोड रोलर फिरवला जात असताना अचानक पूल खचल्याने रोड रोलर पलटी झाला.

मात्र यावेळी या रोड रोलरखाली दबून चालकाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्जत शहरापासून चार किमी अंतरावर थेरवडी येथे घडली आहे. सुनिलकुमार गौड असे त्या मृत चालकाचे नाव आहे.

Advertisement

या बाबत सविस्तर असे की, कर्जत येथील राशीन रोडवरील पाण्याच्या टाकी समोरून जाणाऱ्या कर्जत ते थेरवडी या रस्त्याचे डांबरीकरणचे काम सुरु आहे. हे काम आदित्य कन्स्ट्रक्शन बारामती या कंपनीने घेतले आहे.

या रस्त्यावर दि.६  एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कर्जत पासून तीन किमी अंतरावर असलेल्या कोळवडी शिवारात जुन्या पुल परिसरात रोलरने रस्त्यावरील मुरूम दाबण्याचे काम सुरू होते.

Advertisement

या वेळी तिथे असणाऱ्या जुन्या पुलावरून दबई करून जात असताना तो पुल कोसळला आणि पुलावरून रोलर खाली उलटा पडला.

त्यावेळी हा रोलर चालवत असलेला चालक सुनिलकुमार गौड (वय ३४ वर्षे, रा.बारी उत्तरप्रदेश) हा रोलर खाली दबला, पुलाचे आणि रोलर यांचा आवाज झाल्याने जवळच असणारे मिनिनाथ मोरे आणि काही कामगार पळत आले.

Advertisement

त्यांनी तातडीने जेसीबी लावून गौड  यास बाहेर काढले आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे आणले असता डॉक्टर यांनी तो मयत झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी आदित्य कन्स्ट्रक्शन बारामती या कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून काम करीत असलेले  मिनिनाथ देविदास मोरे (रा.केतुर ता.करमाळा, जि.सोलापूर) यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये येथे खबर दिली आहे .

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

li