Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

भारतीय दांपत्याचा अमेरिकेत मृत्यु ! मुलगी रडत असल्याचे दिसल्याने……

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-अमेरिकेतील न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मूळचे बीडच्या अंबाजोगाईमधील असणाऱ्या दाम्पत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

या दाम्पत्याची मुलगी बाल्कनीत एकटी उभी राहून रडत असताना शेजाऱ्यांनी पाहिलं असता ही घटना उघडकीस आली.

Advertisement

बालाजी भारत रुद्रवार (३२) आणि आरती बालाजी रुद्रवार (३०) अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत. आयटी कंपनीत कामाला असणारे बालाजी रुद्रवार मूळचे बीडच्या अंबाजोगाईमधील आहेत.

कामानिमित्त ऑगस्ट २०१५ मध्ये ते पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.

Advertisement

बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या वृत्तानुसार, माझी नात बाल्कनीत रडत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश करुन पाहिलं असता मृतदेह आढळले”.

वैद्यकीय तपासणीत चाकूने भोसकलं असल्याचं समोर आलं असल्याचं रिपोर्टमध्ये आहे. स्थानिक पोलिसांनी नंतर मला घटनेबद्दल माहिती दिली.

Advertisement

मृत्यूचं अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांनी मला शवविच्छेदन अहवालातील माहिती देऊ असं सांगितलं आहे,” असं भारत रुद्रवार यांनी सांगितलं.

माझी सून सात महिन्यांची गर्भवती होती. आम्ही त्यांच्या घरी गेलो होता. पुन्हा एकदा अमेरिकेला जाऊन त्यांना भेटण्याबद्दल विचार सुरु होता, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement

अमेरिकन प्रशासनाने मृतदेह भारतात येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागलीत असं कळवलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li