महामारी व्यवस्थापनात मोदी सरकार अपयशी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातील कोरोना महामारीची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

तसेच या सरकारने भारताच्या गरजेचा विचार न करताच कोरोना लस निर्यात केल्याने देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले.

सोनियांनी शनिवारी सर्व काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या आघाडी सरकारमधील पक्षाच्या मंर्त्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली.

राहुल गांधीदेखील या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी सोनियांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

कोरोना महामारीसंदर्भात हे सरकार सुरुवातीपासूनच गाफील राहिल्याने आज देशात एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोदी सरकारला या महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाच करता आलेल्या नाहीत. व्यवस्थापनाच्या बाबतीत हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे,

असे सोनिया म्हणाल्या. कोरोना लसीच्या तुटवड्यावरूनही काँग्रेस अध्यक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. सरकारने सर्वात आधी देशातील लसीकरण मोहिमेवर लक्ष देण्याची गरज होती.

कोरोना लस इतर देशांना निर्यात करण्यापूर्वी आणि भेट देण्यापूर्वी आधी आपली गरज भागवणे महत्त्वाचे होते.

मात्र कोणत्याही व्यवस्थापनाशिवाय लस निर्यात केल्यामुळे देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे, असा घणाघात सोनियांनी केला.

सरकारला त्यांच्या त्रुटी दाखवून देऊन जनहितासाठी काम करण्याचा सरकारवर दबाव टाकणे हे एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|