अहमदनगर शहरात अवकाळी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानूसार शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शहरात वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण तयार झाले असून,अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काळे ढग दाटले आहेत. त्यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी पार केला होता. त्यानंतर आता संबंध महाराष्ट्रातील कमाल तापमानात चांगलीच घसरण झाली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवलेआहे. काल काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यानंतर महाराष्ट्रातील मराठवाडा,कोकण आणि विदर्भात गारपीटीसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

यानुसार शनिवारी वातावरणात बदल जाणवत होता. सायंकाळी आकाशात ढग जमा होवून आठ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट व वाऱ्यासह शहरासह ग्रामीण भागात देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|