Breaking News Updates Of Ahmednagar

राज्यात 15 दिवस संचारबंदी ! जाणून घ्या काय असेल काय सुरु, काय बंद?

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राज्यातील वाढत्या कोरोना संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली.

ही संचारबंदी १५ दिवसांसाठी असेल व उद्या (बुधवारी) १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४०० कोटींचे आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे.

Advertisement

उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.पुढचे 15 दिवस संचारबंदी.अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी केलं आहे.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील.

Advertisement

पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील. पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील.

अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे.

Advertisement

तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल. हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल.

तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील,जनावराचे रुग्णालय सुरु राहतील, पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील,अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील, हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.

Advertisement

राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देणार आहोत.

या योजनेमध्ये ७ कोटी नागरिकांचा समावेश आहे. तसेच १० रुपयांची शिवभोजन थाळी ५ रुपयांवर आणली होती. पुढील महिनाभर शिवभोजन थाळी मोफत देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li