अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड मिळेना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- अहमदनगर  जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून हास्पीटलमध्ये बेड न मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव परिसरातील 30 वर्षीय तरूणाचा नगरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

व्हिडीओ क्लीप व्हायरल :- उपचार सुरू असताना ऑक्सीजनचा पुरवठा खंडित झाल्याने अन्य दोन करोना रूग्णांना जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना घडली.

याबाबत व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाशी वारंवार संपर्क साधाला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

बेड शिल्लक नसल्याचे कारण :- श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथून करोना बाधित तरूणाला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, येथे आल्यावर त्यांना बेड शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले.

एवढेच नव्हेतर येथील कर्मचार्‍यांनी त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी नगर शहरातील बहुतांश हॉस्पिटलमधील दरवाजे ठोठावले.डॉक्टरांना विनंती केली.

 अ‍ॅडमीट करण्यास नकार :- कोठे बेड शिल्लक नाही, ऑक्सीजन रेमडीसीवर इंजेक्शन नसल्याचे सांगत अ‍ॅडमीट करण्यास नकार दिला. परिणामी या रुग्णास पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आणले गेले.मात्र, तेथे आणत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला.

याची माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून आत घेण्याची विनंती केली. मात्र, यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. असे नातेवाईकांनी आरोप केला.

 प्रशासन मूग गिळून गप्प :- रविवारी ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह  :- या प्रकरणी दोषी कोण, कोणावर कारवाई केली.श्रीरामपूरच्या तरूणासह तिघांचा नगरमध्ये मृत्यू की नाही, याबाबत देखील रुग्णालय प्रशासन मूग गिळून गप्प आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

उपचारांची स्थिती भयावह :- नगर शहरातील करोनावरील उपचारांची स्थिती भयावह होतांना दिसत आहे. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील कोविड बेड संपले असून यामुळे आता सामान्य नागरिकांनी उपचार कोठे करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|