Breaking News Updates Of Ahmednagar

श्रीरामपूर पालिका लवकरच कोविड सेंटर उभे करणार !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार लहु कानडे यांच्या सहकार्याने श्रीरामपूर शहरात लवकरच कोविड सेंटर उभे राहणार असल्याची माहिती नगरसेवक राजेंद्र पवार यांनी दिली आहे.

याबाबत पवार यांनी पत्रकात म्हटले, की सध्या करोना आजाराने सर्वत्र थैमान घातले असून त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे.

Advertisement

शहराबरोबरच सर्व ठिकाणचे हॉस्पिटल फुल्ल झाले आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच ऑक्सिजन व औषधांची कमतरता आहे.

याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करत नगराध्यक्षा आदिक यांनी पुढाकार घेऊन शहरात पालिकेचे कोविंड सेंटर उभे करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे लवकरच पालिकेचे कोविड सेंटर उभे राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

Advertisement

कोरोना आजारात गंभीर परिस्थीतीतदेखील काही ठराविक लोक राजकारण करताना दिसत आहेत. राजकारण करणाऱ्यांनी अडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरीकांना काय मदत केली, याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरापासून आदिक यांनी शहरातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. आमदार लहु कानडे यांच्या प्रयत्नातुन साकार झालेल्या ५०० बेडच्या कोविड सेंटरमध्ये पालिकेमार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात.

Advertisement

पालिकेची ॲम्बुलन्स, पिण्याचे पाणी, दैनंदिन साफसफाई या कामात पालिकेचे कर्मचारी योगदान देत आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li