Breaking News Updates Of Ahmednagar

सचिन वाझेला पोलीस सेवेतून काढण्याची प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अँटिलिया स्फोटक प्रकरणासह मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असणाऱ्या निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला पोलीस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी एका कारमध्ये स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात एनआयने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला अटक केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

Advertisement

वाझेचे पोस्टिंग विशेष शाखेत असल्याने विशेष शाखेकडून याबाबत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येत आहेत.

विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील कोल्हे यांनी एटीएस आणि एनआयएला पत्र देऊ न वाझे प्रकरणाशी निगडित आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती. सोमवारी ही कागदपत्रे विशेष शाखेला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li