Breaking News Updates Of Ahmednagar

रेमडेसिवीर कोरोनावर प्रभावी असल्याचे पुरावे नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-रोना रुग्णांसाठी लाभदायी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधीचा देशात तुटवडा निर्माण झाला असताना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंगळवारी पुन्हा एकदा रेमडेसिवीर कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे कोणतेही वैद्यकीय पुरावे अस्तित्वात नसल्याचा पुनरुच्चार केला.

‘कोरोनामुळे होणारे मृत्यू व रुग्णांचा व्हेंटिलेशनचा कालावधी कमी करण्यासाठी रेमडेसिवीरची कोणतीही मदत होत नाही, हे नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांद्वारे स्पष्ट झाले आहे,’ असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन व डॉक्टर मारिया वॅन केरखोव यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

Advertisement

‘डब्ल्यूएचओ’ने यापूर्वीच हे औषध कोरोनावर परिणामकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही भारतासह जगभरातील अनेक देशांत हे औषध कोरोनावर उपाय म्हणून वापरले जात आहे.

विशेषत: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजलेल्या भारतात या अँटिव्हायरल औषधीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘रेमडेसिवीरच्या उपयुक्ततेविषयी आतापर्यंत ५ वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.

Advertisement

त्यात रुग्णालयांत दाखल रुग्णांना रेमडेसिवीर दिल्यानंतर मृत्युदरात घट झाल्याचे किंवा त्यांच्या रुग्णालयातील कालावधीत घट झाल्याचे अथवा कोरोनावर हे औषध परिणामकारक असल्याचे कोणतेच पुरावे आढळले नाही,’ असे स्वामिनाथन म्हणाल्या.

तर डॉक्टर मारिया यांनी पुरावे नसतानाही या औषधीचा कोरोना रुग्णांवर सशर्त वापर करण्याची शिफारस करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ‘पुराव्यांचा अभाव असला तरी रेमडेसिवीरमुळे रुग्णांच्या प्रकृतीत काहीअंशी सुधारणा होते.

Advertisement

त्यामुळे आम्ही त्याचा सशर्त वापर करण्याची शिफारस केली आहे. सध्या या औषधीवर अनेक चाचण्या सुरू असून, आमचे त्यावरच लक्ष केंद्रित आहे,’ त्या यासंबंधी बोलताना म्हणाल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li