Breaking News Updates Of Ahmednagar

आणि अहमदनगर जिल्ह्यातील ते खासदार म्हणाले मी काय ब्राह्मणांच्या घरातील नाही…

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात करोना संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याच्या कारणावरून शाई फेकण्याचा प्रकार घडलेला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Advertisement

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत वंचीत बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला.

नेवासा तालुक्यातील करोना संदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज गुरुवारी नेवासा पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली.

Advertisement

या आढावा बैठकीत वंचीत आघाडीचे संजय सुखदान यांनी खासदारांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला. यावेळी तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केला व सुखदान यांच्या हातून शाईची बॉटल घेतली.

यानंतर गट विकास अधिकारी साहेब यांच्या दालनात सविस्तर चर्चा सुरू असताना शाब्दिक चकमकीत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या तोंडून निघालेल्या उद्धगारांनी सर्व अवाक झाले.

Advertisement

खासदार लोखंडे म्हणाले, ‘मी देखील दलित आहे, मी काय ब्राह्मणांच्या घरातील नाही’ असा शब्द खासदार लोखंडे यांच्या तोंडून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.खासदार लोखंडे यांचे हें शब्द काही वेळ चर्चेचा विषय बनले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li