डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती संयुक्तपणे रक्तदानाने साजरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-भिंगार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसुर्य महात्मा फुले यांची जयंती संयुक्तपणे रक्तदानाने साजरी करण्यात आली.

जयंती उत्सवाच्या वतीने सर्व खर्चांना फाटा देत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपिढीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान करुन महामानवांना अभिवादन केले. प्रारंभी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

अशोक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष सुहास धीवर, प्रदिप भिंगारदिवे, डॉ. राजेंद्र काळे, भाऊ कर्डिले, दिपक अमृत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुहास धीवर म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात माणुसकीने सर्वांना आधार देण्याची गरज आहे. रक्त कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या तयार होत नसल्याने, रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबुन रहावे लागते.

कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या संकटकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारांची समाजाला गरज आहे.

आलेल्या या संकटात गोर-गरीब व गरजूंना मदत करुन सामाजिक कार्य करण्याची संधी आहे. बाबासाहेब व महात्मा फुले यांना अभिप्रेत समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजक विकास चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. जिल्हा रुग्णालय रक्तपिढीचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्‍वर मगर यांनी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हा तुटवडा भरुन काढण्यासाठी सर्वांनी विविध उपक्रम, सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी व वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याचे आवाहन केले. शिबीरासाठी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.सुमय्या खान यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोरोनाच्या नियमांचे पालन करुन रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे विकास चव्हाण, सुमेध थोरात, प्रतिक धीवर, धीरज भिंगारदिवे,

प्रकाश भोसले, अक्षय भिंगारदिवे, शुभम धीवर, ऋतिक धीवर, गणेश भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, प्रतिक भुसारी, उमेश साठे, सृजन भिंगारदिवे, आकाश झांजोट आदींनी परिश्रम घेतले. भिम वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|