Breaking News Updates Of Ahmednagar

अवकाळी पावसाने वातावरणातील उकाडा नाहीसा होवून ‘गारवा’ !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-नगर शहर, उपनगर तसेच तालुक्याच्या काही ठिकाणच्या ग्रामीण भागात बुधवारी (दि. १४) सायंकाळी अवकाळी पाऊस झाला.

१० ते १५ मिनिटे अवकाळी पाऊस पडल्याने सखल भागात बऱ्यापैकी पाणी साचले होते. अवकाळी पावसाने वातावरणातील उकाडा नाहीसा होवून गारवा निर्माण झाला होता. बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. प्रचंड उकाडा निर्माण झाला.

Advertisement

दुपारी ५ नंतर अवकाळी पाऊस पडेल असेच वातावरण निर्माण झाले होते. सुसाट वारा वाहिल्यानंतर सायंकाळी ६.१५ च्या सुमारास अवकाळी पावसाचे सरी पडल्या. न गर शहर व उपनगरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.

तालुक्याच्या ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस पडला असल्याचे वृत्त आहे. हवामान खात्याने आठ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.

Advertisement

यापूर्वी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या होत्या. बुधवारी अवकाळी पाऊस १० ते १५ मिनिटे झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li