परदेशातही निनादला जय भिमचा गजर भारतीयांनी एकत्रित येऊन महामानवास केले अभिवादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सँन होजे येथे नॉर्थ पार्कमध्ये साजरी करण्यात आली.

कॅलिफोर्निया राज्यात सँन होजे येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी केली. जयंती निमित्ताने परदेशातही जय भिमचा गजर निनादला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी केतन मेहेता (मुबंई), विश्‍वनाथन (मुबंई), सबजीतसिंग (मुबंई), सुब्रमण्यम (हैद्राबाद), संजय पटेल (अहमदाबाद), वेणू गोपाल (हैद्राबाद), अतुल कुमार (बिहार) आदी भारतीय नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणारे डॉ. बाबासाहेबांचे विचार आजही सर्व समाजाला दिशादर्शक आहे.

महापुरुषांच्या विचारांनी व प्रेरणेने बदल घडणार असून, त्यांची मार्गदर्शक तत्त्वे मानवतेच्या उध्दारासाठीच आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाने परिस्थिती गभीर होत असताना, शासनाच्या नियमांचे पालन करुन, नागरिकांनी आपली जबाबदारीचे कर्तव्य पार पाडल्यास या संकटावर मात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती परदेशात साजरी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|