विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्या कारणामुळे अहमदनगर दौऱ्यावर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरनात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी महाविकास आघाडीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर मोठे आरोप केल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे.

त्यातच, आता थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील दातीर कुटुंबाच्या सांत्वनासाठी राहुरीत येणार असल्याने या प्रकरणाला आणखी हवा मिळणार आहे राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची गेल्या दहा दिवसापूर्वी राहुरीतील बाजारपेठेतुन भर दुपारी अपहरण करून हत्या केली होती.

या हत्येनंतर माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन दातीर हत्येप्रकरणाशी ना.तनपुरे यांचा संबध असून चौकशी करण्याची मागणी केली. ना.प्राजक्त तनपुरे यांनी कर्डीले यांच्या आरोपाचे खंडन केले.

मात्र त्यानंतरही कर्डीले शांत राहिले नाही. आज दातीर कुटुंबाच्या भेटीला प्रा राम शिंदे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे. पत्रकार निशांत दातीर, आदी मान्यवर उपस्थित होते.

या घटनेबद्दल तीव्र संताप आणि चिंता व्यक्त करून माजी मंत्री प्रा राम शिंदे म्हणाले की ,एका पत्रकाराचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या होते ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाच्छनास्पद आहे.

दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील अनेक गैरकृत्य उजेडात आणली होती.लोकांच्या हक्कासाठी लढताना अनेक हितसंबंधी त्यांचे शत्रू झाले होते.

दातीर यांच्या लेखणीमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत अशाच धेडांनी त्यांची हत्या घडवून आणली असावी असा अंदाज व्यक्त करत आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे.

मयत रोहिदास दातीर यांच्या पत्नीचा पुरवणी जबाब नोंदवला पाहिजे. या हत्येनंतर फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली पाहिजे. दातीर परिवार हत्येनंतर भयंकर भीतीदायक वातावरणातून जात आहे.

मात्र आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगून लगेच नगर येथे जावून वपोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तपासाला गती देण्याची मागणी केली.

यावेळी माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दातीर कुटुंबाच्या सांत्वनासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राहुरीला येणार असल्याचे सांगितले असून या प्रकरणाला आता आणखी हवा मिळणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|