Breaking News Updates Of Ahmednagar

‘कुकडी’च्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अटक!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- कुकडीपाणी प्रश्नासाठी श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील कुकडी कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य दिकर पंधरकर , प्रमोद जगताप , सुरेश भापकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी , संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी या चौघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केले असून, आंदोलन केल्या प्रकरणी चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले की, डिंबे माणिकडोह जोड कालव्याचे काम लवकर सूरू करावे, तसेच १० मे रोजी सुटणारे कुकडीचे आवर्तन हे २५ एप्रिलला सोडावे.

या मागणीसाठी कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही. मात्र शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

Advertisement

या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी , विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते विजयराव जावंधिया, प्रकाश पोहरे , सामाजिक कार्यकर्त्यां मेधाताई पाटकर , सेवानिवृत्त आयपीएस सुरेश खोपडे यांनी पाठिंबा दिला आहे.

आंदोलकांवर केलेल्या कारवाईचा राज्यभर निषेध होणार असून, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहोत. असेही ते म्हणाले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li