Breaking News Updates Of Ahmednagar

रेमडेसिवीर, ऑक्सिजनबाबत प्रशासनाची तारेवरची कसरत

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे.

इंजेक्शन आणि ऑक्सिजन याची दैनंदिन मागणी आणि प्रत्यक्षात असलेला पुरवठा याचे प्रमाण व्यस्त आहे.

Advertisement

मात्र, आहे त्या परिस्थितीला तोंड देत समाधान करण्याचा बाका प्रसंग सध्या प्रशासनासमोर ठाकला आहे.

जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती रिअल टाईम पद्धतीने नागरिकांना मिळण्यासाठी कंट्रोल रूम (दुरध्वनी क्र.०२४१ २३४५४६०) कार्यान्वित करण्यात आला आहे.

Advertisement

याकामी नोडल अधिकारी म्हणून महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व सहायक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी निचीत यांनी जारी केले आहेत. दर दिवशी वाढत जाणारा बाधितांचा आकडा आणि उपचारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटीचा पुरवठा यामुळे नवे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे.

Advertisement

हीच परिस्थिती राज्यात आहे. तुटीचा प्रसंग ही काही महाभागांनी बेगमी करण्याच्या हिशोबाने नामी संधी मानली. बाधितांवर उपचारासाठी डॉक्टर साहेबांनी दिलेल्या चिठ्ठीत रेमडीसिविर असल्याने बाधितांच्या नातेवाईकांची या इंजेक्शनची शोधमोहीम करण्यासाठी पायपीट सुरू झाली.

मात्र, सध्या या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या चारही कंपन्यांकडून मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा होत आहे. या परिस्थितीत होणाऱ्या काळ्याबाजाराचा ही शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी या कामी थेट निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांची नियुक्ती केली आहे.

Advertisement

मात्र, गरज चार हजाराची आणि पुरवठा हजार, बाराशे असा कमी असल्याने इंजेक्शनचा बोभाटा कमी होण्याचे नाव घेत नाही. हीच परिस्थिती ऑक्सिजनच्या बाबतीतही प्रकर्षाने आढळून येते आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li