वैद्यकीय क्षेत्रात खळबळ : कोरोना व्हायरस देतोय चाचणीलाही धोका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणासह कोरोना चाचण्यांचेही प्रमाण वाढत आहे.

सध्या कोरोना चाचणी आरटीपीसीआर टेस्टमार्फत केली जाते. मात्र कोरोना आता आरटीपीसीआर चाचणीलाही चकवा देऊ शकतो, असे उघड झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असताना तसेच लक्षणं असतानाही १५ ते ३० टक्के रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे.

काही दिवसांपूर्वी डॉक्टरांना असे रुग्ण आढळून आले ज्यांना ताप, खोकला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. सिटी स्कॅनमध्ये सौम्य असे ग्रे पॅच होते. ज्यामुळे कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट होते.

तरीही त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. यापैकी काही रुग्णांची ब्रोन्कोअलेवलर लॅव्हेज करण्यात आलं. यामध्ये मात्र ते रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ज्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह होती.

यातून कोरोना व्हायरस आरटीपीसीआर टेस्टलाही धोका देण्यात सक्षम असल्याचे स्पष्ट होत आहे. तज्ञांच्या मते, या रुग्णांच्या घशात किंवा नाकात तेव्हा व्हायरस नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना व्हायरसने कदाचित स्वतःला फुफ्फुसातील पेशींमध्ये आढळणारं प्रोटिन म्हणजे एसीई रिसेप्टरशी जो़डलं असावं. त्यामुळे जेव्हा ब्रोन्कोअलेवलर लॅव्हेजमध्ये फुफ्फुसातील द्रवाचा नमुना घेण्यात आला तेव्हा त्या कोरोना व्हायरस सापडला

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|