अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १० हजार १५९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३०५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७६५७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५२५ आणि अँटीजेन चाचणीत १६९६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३, जामखेड ३६, कर्जत ४७, कोपरगाव १६, नगर ग्रामीण २४, नेवासा ५८, पारनेर ५५, पाथर्डी ३२, राहता ५८, राहुरी २८, संगमनेर ७१, शेवगाव ५४, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर ७६, कॅंटोन्मेंट बोर्ड २९ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१५, अकोले ०९, जामखेड ०३, कर्जत ०५, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण २७, नेवासा ०४, पारनेर ११, पाथर्डी २५, राहाता १०४, राहुरी १६, संगमनेर ५५, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर १२, कॅंटोन्मेंट बोर्ड १५ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६९६ जण बाधित आढळुन आले. मनपा २९२, अकोले १०६, जामखेड ०७, कर्जत १४७, कोपरगाव १४४, नगर ग्रामीण २२२, नेवासा ९३, पारनेर ६२, पाथर्डी ८७, राहाता १२३, राहुरी ९६, संगमनेर ४२, शेवगाव ९०, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर ९०, कॅन्टोन्मेंट बोर्ड ४७ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५१४, अकोले १२०, जामखेड ६३, कर्जत ११२, कोपरगाव १३१, नगर ग्रामीण १०९, नेवासा ५०, पारनेर ४३, पाथर्डी १४४, राहाता २५५, राहुरी ६८, संगमनेर १५६, शेवगाव ५२, श्रीगोंदा ४०, श्रीरामपूर १११, कॅन्टोन्मेंट ५७, इतर जिल्हा २६ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,१०,१५९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१७६५७
  • मृत्यू:१४४१
  • एकूण रूग्ण संख्या:१,२९,२५७
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|