Breaking News Updates Of Ahmednagar

संचारबंदीच्या कालावधीत शाळा, महाविद्यालय, शिक्षक व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमावस्था

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसाची संचारबंदी लागू केली असून, या कालावधीत शाळा, महाविद्यालयांची कार्यालय सुरु ठेवणे, शिक्षकांची उपस्थिती याबद्दल स्पष्ट आदेश निर्गमीत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण उपसंचालक व राज्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

Advertisement

राज्यात कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेली अत्यंत भयावह, गंभीर परिस्थिती विचारात घेऊन कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 14 एप्रिल ते 1 मे दरम्यान पंधरा दिवसासाठी संचारबंदीची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

या संचारबंदीच्या कालावधीत शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाही. तर या कालावधीत शाळा महाविद्यालयांची कार्यालय सुरू ठेवावे किंवा कसे?,

Advertisement

तसेच शिक्षक व कर्मचार्‍यांची उपस्थिती संदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेला नसल्याने राज्यातील शिक्षण क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यासाठी संचारबंदीच्या कालावधीत शाळा, महाविद्यालयांची कार्यालय सुरु ठेवणे,

शिक्षकांची उपस्थिती याबद्दल स्पष्ट आदेश निर्गमीत करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे,

Advertisement

सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर,

अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर यांनी देखील शिक्षण अधिकार्‍यांना स्पष्ट आदेश निर्गमीत करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li