Breaking News Updates Of Ahmednagar

प्रशासनाने अधिक संवेदनशील होऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करावी

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात सध्याची कोरोनाची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नाहीत,

व्हेन्टीलेटर उपलब्ध नाहीत, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नोबल हॉस्पिटल,सुरभी हॉस्पिटल,मेक्सकेअर हॉस्पिटल ,

Advertisement

साईदीप हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सदर परिस्थिती संदर्भात भेट घेतली त्यानुसार जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडून सविस्तर माहिती घेऊन ताबडतोब मा.ना.हसन मुश्रीफ पालकमंत्री,राजेश टोपे आरोग्यमंत्री,

मा.चंद्रकांतदादा पाटील प्रदेशांध्यक्ष ,मा.ना.डॉ.राजेंद्र शिंगणे मंत्री अन्न व औषध प्रशासन,मा.राज साहेब ठाकरे मनसे पक्षप्रमुख ,

Advertisement

डॉ.तात्याराव लहाने संचालक आरोग्यविभाग या वरिष्ठांशी संपर्क करून अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थितीवर ताबडतोब कार्यवाही करण्याची कळकळीची विनंती केली.त्याप्रमाणे कार्यवाही झाली तरच सर्वसामान्य माणसाना मदत होईल.

गेल्यावर्षी लॉकडाऊन झाल्यावर ज्याप्रमाणे लोक आपल्या गावाकडे पायी पायी जात होते त्याचप्रमाणे यावर्षी लोक बेड व व्हेटीलेटर कसे उपलब्ध होतील यासाठी सैरभैर झाले आहेत.त्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील होऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करावी.

Advertisement

अधिकारयाची नेमणूक करून जबाबदारी निश्चित करावी.कुठलीही कारवाई न करता मनोबल वाढवून काम करण्याची गरज आहे.फक्त कारवाईने समस्या सुटत नाहीत तर समुपदेशनाने समस्या सुटतात.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li